
Cultural
OCT 18, 2025
Deep Sandhya
सुरेल गीतांनी सजली ‘दिप संध्या’..
दिवाळीच्या शुभसंध्येला आयोजित ‘दिप संध्या’ हा मराठी सुरेल गीतांचा मनमोहक कार्यक्रम नागरिक प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाला. संगीत, स्वर शब्दसुमनांनी वाहिलेले निवेदन आणि प्रेक्षकांच्या टाळ्या अशा आनंददायी वातावरणात ही सायंकाळ रंगली व उपस्थित नागरिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला.
या सुरेल संध्येला आमदार हेमंतभाऊ रासने यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी भाजपा कसबा मंडल अध्यक्ष अमितजी कंक व विविध मान्यवर, सहकारी उपस्थित होते. संगीतकार निनाद सोलापूरकर यांच्या संयोजनातून तसेच, गायक अक्षय घाणेकर आणि अभिजीत वाडेकर, गायिका अंजली मराठे आणि रश्मी मोघे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने दिवाळीच्या उत्सवाला सुरांचा साज चढवला. स्नेहल दामले यांच्या प्रभावी निवेदनाने कार्यक्रमाला दिशा मिळाली, तबल्यावर नितीन शिंदे, कीबोर्डवर मंदार देव, पखवाजावर नागेश भोसेकर, वेस्टर्न रिदमवर अभिषेक काटे आणि गिटारवर राधिका अंतुरकर यांनी आपल्या सुरेल साथीनं कार्यक्रमाची लय अधिक खुलवली.
कार्यक्रमाचे आयोजन राघवेंद्र बाप्पू मानकर मित्र परिवार, ओंकार ग्रुप आणि वर्तक बाग परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
Comments
No approved comments yet. Be the first to share your thoughts.
Other Events
Unstoppable Tukaram
AUG 07, 2026
Railway Connectivity Public Interaction Program
JUN 24, 2026
Raise an Concern
Over 5,000 concerns have been reported to local authorities.
Raise a Complaint
Over 5,000 concerns have been reported to local authorities.
Are You a Leader?
Become a part of our MyJansevak!




Share Your Thoughts
Share your feedback or questions about this event. Your comment will appear here after approval.